पुर्ण रक्कम जमा केल्यानंतरच आपले दालन आरक्षीत होईल, नोंदणीचा शेवटचा दिनांक १५ जानेवारी २०२४ असेल.
ग्रंथ दालन अधिक माहिती व संर्पकासाठी प्रा.गौतम निकम 9423915510 दिपक बिऱ्हाडे 09545906518
नियम व अटी
1. दिनांक ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी आर. के.नगर समोर, धुळे रोड, अमळनेर येथे होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनासाठी हे दालन असेल.
2. एका ग्रंथ दालनाचा आकार १० बाय १० फुट असेल, एका दालनासाठी ३५००/- रक्कम भरावी लागेल. एका व्यक्तीस/ प्रकाशकास/ विक्रेत्या कंपनीस ४ पेक्षा जास्त दालने मिळणार नाहीत.
3. पुर्ण रक्कम जमा केल्यानंतरच आपले दालन आरक्षीत होईल, नोंदणीचा शेवटचा दिनांक १५ जानेवारी २०२४ असेल, मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. आपल्याला आरक्षित असलेले दालन इतरांना देता येणार नाही, बदलता येणार नाही आणि इतरांसोबत भागीदारीत वापरता येणार नाही
5. आपल्या दालनाची स्वच्छता स्वतः ठेवावी लागेल.
6. आपल्याला मिळालेले साहित्य म्हणजेच २ टेबल, २ खुर्ची, २ बेडशिट. दालन खाली करताना सुस्थितीत परत करावे लागतील. वस्तुची मोडतोड, गहाळ होणे यासाठी नुकसान भरपाई द्यावी लागेल. आयोजकाकडून सुरक्षा रक्षकाची व्यवस्था केलेली असली तरी आपल्या साहित्याची चोरी किंवा नुकसान यासाठी आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
7. आपल्या अधिकृत दोन कर्मचाऱ्याची माहिती, त्यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो व आधार कार्डाची प्रत ग्रंथप्रदर्शन समितीकडे पोहचवावी